भोकर :(रमेश गंगासागरे ) वेगवेगळा छोटा मोठा व्यवसाय व मजुरीसाठी भोकर येथे गेल्या चार ते पाच महिन्यापासून असलेले मध्यप्रदेशातील 44 नागरिक लाँकडाऊनच्या  काळात  अडकून पडले होते या सर्वांना आज महाराष्ट्राची लाल् परी एसटी महामंडळाने  मध्यप्रदेश कडे रवाना करण्यात आले आहे .
       देशात कोरोना  सारखा महाभयंकर संसर्गजन्य रोग फैलावू नये म्हणून केंद्र सरकारने 22 मार्च रोजी अचानक लाँडाउन संचारबंदी लागू केली यामुळे भोकर येथे काही व्यवसायिक पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले मजूरदार भटके गावाबाहेर पालामध्ये अडकून पडले होते, भोकर शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्ती, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक व  राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांची गेल्या दीड महिण्यापासून भोजनाची व अन्नधान्याची व्यवस्था केली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात हे भोजनदान कमी पडत असल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती,
       सरकार लाँकडाऊन जाहीर करतेवेळी गोरगरीब मजूर कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी चार-पाच दिवसाची संधी द्यायला हवी होती, ज्यामुळे हजारो-लाखो मजुरावर उपाशी राहण्याची व आपल्या गावी पायी जाण्याची वेळ आली नसती, भोकर मध्ये असेच कांही लोक आपल्या गावी जाण्यासाठी तडफडत होते, शासनाने उशिरा निर्णय घेतल्यामुळे या लोकांचे बेहाल झाले, तहसीलदार यांचेकडे अर्ज केल्यानंतर रितसर परवानगीने दि.12 मे रोजी भोकर आगारातून बस क्रमांक एम एच १३सीयू ८६५३चालक एन एच वाघमारे, बस क्रमांक एम एच 13 सीयू 7249 चालक एम.एम.भुजबळ, एस.एस.पोटजळ हे प्रत्येक बसमध्ये २२प्रवाशी मध्येप्रदेश सिमेकडे रवाना होत असताना नायब तहसीलदार संतोष कामठेकर, संजय सोलंकर, महेश वाकडे आगारप्रमुख सुभाष पवार, वाहतूक निरीक्षक बालाजी मदने, एस.एस.ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे पत्रकार संघाचे अध्यक्ष बि.आर. पांचाळ ज्येष्ठ पत्रकार,  बाबुराव पाटील, मा.न.सेवक,माजी नगरसेवक विजया घुमनवाड, सावली प्रतिष्ठानचे डॉक्टर विजय दंडे, अमोल मारूडवार, महेश नारलावार, चंद्रकला गायकवाड आदिनी त्यांना प्रेमाचा निरोप दिला, यावेळी आपल्या गावी जाताना सर्व महिला पुरूष भोकरवासीयांच्या प्रेमाने भारावून गेलेले दिसले, सावली प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून भोजन दानाची व्यवस्था करण्यात येत होती, यावेळी त्यांना भोजनाचे डबे व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व प्रेमभावाने त्यांना निरोप देण्यात आला. भोकर वासियांचे प्रेम कधीच विसरणार नसल्याच्या भावना अनेकांनी भोकर न्यूज लाइव्ह शी बोलताना व्यक्त केल्या.