भोकर :(रमेश गंगासागरे ) कोरोना वर अत्यंत प्रभावी होमिओपॅथिक  गोळ्या आर्सेनिक अल्बम -30  ह्या वरदान ठरत असल्याने ह्या गोळ्या  लातूर येथून डॉक्टर नागुरे यांनी भोकर येथे  वाटपासाठी पाठविल्या आहेत .
संग्रहित छायाचित्र

       कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाच्या विळख्यात सर्व जग होरपळत असताना व हजारो लोक आपले जीव कमावत असताना त्यावर उपाय करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेला आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या घेतल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढून कोविड- 19 पासून बचाव करण्यासाठी खूपच उपयुक्त आहेत, ह्या गोळ्या डॉक्टर उर्वी नागुरे लातूर यांनी भोकर येथील सर्व न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी इतर अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचारी पोलिस कर्मचारी व पत्रकार यांना पुरवठा करण्यासाठी लातूर हून पाठविले आहेत. होमिओपॅथीच्या 4 गोळ्या दररोज दोन वेळा उपाशीपोटी घेतल्याने कोविंड -19 चा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव होऊ शकतो आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या डॉक्टर उर्वी नागुरे लातूर यांनी पाठविल्याबद्दल भोकर येथील जिल्हा न्यायाधीश एम एस शेख,  पांडे दिवाणी न्यायाधीश, श्री पवन चांडक उपविभागीय अधिकारी, श्री भरत सूर्यवंशी तहसीलदार, टोंगे मॅडम नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी बांधवांनी डॉक्टर उर्वी नागोरे यांचे आभार मानले आहेत.

यासह अधिकच्या बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या HOME वर क्लिक करा