भोकर : (रमेश गंगासागरे ) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानावर गरिबांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या गहू आणि तांदळा सोबतच डाळ चहा पत्ती साखर तेल मीठ मिरची हळद इत्यादी वस्तू तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी भोकर येथील नाम फाउंडेशनच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना ईमेल द्वारे करण्यात आली आहे.

       ई-मेल द्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या गोरगरिबांचे अतोनात हाल होत आहेत, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात उद्धवला असल्याने, त्यांच्यासाठी राशन दुकानावरून देण्यात येणाऱ्या तांदूळ आणि गव्हासह तेल, मीठ, मिरची, साखर, हळद, चहापत्ती, दाळ इत्यादी जिन्नस देऊन गरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवावा, अशी विनंती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज दि, 3 एप्रिल रोजी भोकर येथील नाम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे, निवेदनावर नाम फाऊंडेशनचे डॉक्टर अशोक बेलखोडे, इंजिनियर विश्वंभर पवार आणि डॉक्टर बालाजी कोंपलवार यांच्या सह्या आहेत.