भोकर :(रमेश गंगासागरे ) लॉक डाऊनच्या कार्यकाळात गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी भोकरचे आमदार तथा राज्याचे बांधकाम मंत्री मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या सूचनेवरून भोकर शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गरीब व गरजू पाचशे कुटुंबांना नुकतेच अन्नधान्याचे वाटप केले आहे.
![]() |
| अन्नधान्य वाटप करताना विनोद पा. चिंचाळकर यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत आहेत. |
मागील दहा दिवसापासून संबंध भारतभर, भारत सरकारने कोरोना सारखा महाभयंकर रोग जनसामान्यांमध्ये पसरू नये म्हणून लॉक डाऊनची घोषणा केली आहे, त्यामुळे मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भोकर शहरातील अनेक कुटुंबांची उपासमार होत होती, भोकर शहरातील अनेक सामाजिक संघटना, न्यायालय, नागरिक यांच्यासोबतच काँग्रेस पक्षानेही गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे पाकिटे पुरवून, उदरनिर्वाहासाठी हातभार लावल्याने अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते, शहरातील फुलेनगर, शास्त्रीनगर, भीम टेकडी, नंदीवाले गल्ली, रशिद टेकडी या भागात असणाऱ्या व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ, साबण, तोंडावर लावण्याचा मास्क, डाळ, तेल आदी वस्तू देण्यात आल्या, यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, काजू इनामदार यांच्यासह अनेक कॉंग्रेस पदाधिकार्यांची उपस्थिती होती.

0 Comments