भोकर : (रमेश गंगासागरे ) येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस हे कोरोना सारख्या महामारीतही घरोघरी जाऊन बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करत आहेत त्यांना कसल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध करून करुन दिले नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय सुविधा व विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भोकर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिनांक 31 मार्च रोजी तहसीलदार भोकर यांना विनंती अर्ज दिला आहे.
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
अल्पशा मानधनावर आजपर्यंत काम करत आलेल्या अंगणवाडी सेविकांना शासनाच्या विविध कामकाजाखाली कार्य करावे लागत आहे. पोलिओ, हत्तीरोग, लसीकरण ऑफिसने नेमून दिलेले दैनंदिन कार्यक्रम आणि आता कोरोना सारख्या महामारीत गृहभेटी करून बाहेरून आलेल्या नागरिकांचा सर्वे करणे, तसेच ज्या कुटुंबांना आजपर्यंत शिधापत्रिका नाहीत अशांचा सुद्धा सर्वे करण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात आलेले आहे पण शासनाने त्यांचा कसल्याही प्रकारचा विमा उतरवला नाही म्हणून दिनांक 31 मार्च रोजी भोकर शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शासनाच्या योजना व विमा मिळण्यासाठी विनंती अर्ज दिला आहे, अर्जाची प्रत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नांदेड, मुख्याधिकारी नगरपरिषद भोकर, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भोकर, यांना देण्यात आल्या असून निवेदनावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सह्या आहेत.

0 Comments