उमरी :(प्रतिनिधी ) तालुक्यातील ईश्वरनगर तांडा पोस्ट गोरठा तालुका उमरी येथील पोलीस पाटील यांनी कोरोना ग्रस्त रुग्णांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास पाच हजार रुपयांची देणगी दिली आहे.

        संबंध देशाला सळो कि पळो करून सोडणाऱ्या कोरोना, कोविड- 19 या रोगास अनेक नागरिक बळी पडत आहेत, तर या रोगाची हजारो नागरिकांना बाधा झालेली आहे, त्यामुळे संबंध भारत देशात जनता कर्फ्यू आणि लॉक डाऊन मागील अनेक दिवसापासून चालू आहे, सरकारनेही जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे, बाधित रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत म्हणून पोलीस पाटील अरुण नामदेव राठोड यांनी मनाचा मोठेपणा राखत रोख पाच हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे पाठवली आहे, त्यामुळे त्यांचे संबंध तालुक्यात अभिनंदन होत आहे.