भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर पंचायत समितीचे माजी सभापती तथा  नांदेड जिल्हा परिषदेचे  माजी  जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार गोरठेकर यांचे विश्वासू रमेश सरोदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

       दलित चळवळीत अग्रेसर असलेले मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथील रहिवाशी रमेश भाऊ सरोदे यांचे नांदेड येथील अश्विनी रुग्णालयात कॅन्सरच्या आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज दिनांक 14 एप्रिल रोजी मुदखेड तालुक्यातील कोल्हा या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत मनमिळावू आणि मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते, त्यांनी दलित चळवळीत व नामांतराच्या काळात अनेक गावात तीव्र लढा उभारला असल्याने ते सर्व परिचित झाले होते.
       रमेश सरोदे यांना भोकर न्यूज लाईव्ह तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.