भोकर :(रमेश गंगासागरे ) कोरोना सारख्या महामारीत संपूर्ण भारतभर लॉक डाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाची हेळसांड होऊ नये म्हणून भोकर येथील न्यायदेवता ही गरजू लोकांच्या मदतीला उतरलेली दिसून आली.
मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी भोकर शहरात बाहेरील जिल्ह्यातून येऊन उपजीविका करणारे व मोलमजुरी करणारे असंख्य नागरिक तंबू ठोकून असल्याचे व त्याची उपासमार होत असल्याचे दिसून आल्यावरून भोकर येथील जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी अशा 35 ते 40 गरजू कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना एक आठवडा पुरेल एवढे तांदूळ, गहू, तेल, साखर, तुरदाळ, चहापत्ती, बिस्कीटचे पुडे, अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मानवतेचा संदेश दिला आहे. भोकर शहरातील बटाळा रोड,उमरीरोड,किनवट रोड, नांदेड रोडवरील मोलमजुरी करून नागरिक असल्याची कुणकुण न्यायाधीश महोदयांना लागताच त्यांनी तात्काळ आपला ताफा घेऊन प्रत्यक्ष तंबू ठोकून असलेल्या मजूरा पर्यंत जाऊन त्यांना मदत दिल्याने मजुरी करून जीवन जगणाऱ्या नागरिकांचे डोळे पाणावले होते, प्रत्यक्षात न्यायदेवता आमच्या घरी येऊन आम्हाला न्याय दिल्याची भावना अनेक नागरिकांनी भोकर न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या.
यावेळी न्यायाधीश श्री मुजीब शेख यांच्यासोबत न्यायाधीश श्री पांडे सर, तहसीलदार मुंढेसर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे मॅडम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


0 Comments