भोकर :(रमेश गंगासागरे ) तेलंगणातील एक फरार ट्रक चालक ट्रक घेऊन महाराष्ट्रात आला असल्याने रहाटी चेक पोस्ट नाक्यावर तैनात असलेल्या 12 पोलिसासह 18 जणांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात क्वांरनटार्ईन करण्यात आले आहे.
शेजारच्या तेलंगणातील एक ट्रक चालक ईसम कोरोना बाधित असल्याने त्यास तेलंगणा पोलीस शोधत होती, पण भोकर पोलिसांना याची कल्पना नव्हती, तो कोरोना बाधित ट्रक चालक आंबे भरलेला ट्रक घेऊन मैसा रोडवर असलेल्या रहाटी चेक पोस्ट वर आल्याने तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या भोकर ठाण्याच्या 1 एपीआय, 2 पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी 2 होमगार्ड, 1 स्वयंपाकी व चेक पोस्ट नाक्यावरील 3 कर्मचारी अशा एकूण 18 जणांच्या संपर्कात आला असल्याने या सर्व 18 जणांना शनिवारी सायंकाळी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे, ट्रक चालक हा तेलंगणात कोरन टाईम असताना तो महाराष्ट्रात ट्रक घेऊन आलाच कसा? याची चौकशी तेलंगाना पोलीस करत आहेत, तो भोकर मार्गे नाशिक आणि बुलढाणा येथे गेला होता, परतीच्या प्रवासातही त्याने भोकर मार्गे तेलंगणात परत जाण्याच्या तयारीत असताना त्यास भोकर पोलिसांनी पकडून तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, तर भोकर येथील त्याच्या संपर्कात आलेल्या 18 कर्मचाऱ्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून हे नमुने औरंगाबादच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, आता हा तपासणीचा अहवाल काय येतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments