भोकर : (रमेश गंगासागरे )  आज होईल उद्या होईल असे म्हणण्या मध्ये मागील तीन वर्षापासून भोकरच्या उड्डाणपुलाचे काम स्थगित असल्यामुळे भोकर वासीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
       भोकर ते नांदेड रोड वरील उड्डाण पुलाचे काम मागील तीन वर्षापासून बंद आहे त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे, पुलाच्या आजुबाजूला रोडचे काम अपूर्ण राहिल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढलेले आहे, तर रेल्वे गेट जवळ असणारा मोठा नाला बंद झाल्यामुळे या ठिकाणी गटारास मोठे स्वरूप आले असल्याने, त्याचे छोट्या तळ्यात रूपांतर झाले आहे, त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना ह्या गटाराचा मोठा त्रास होताना दिसून येत आहे, गटाराचे पाणी नागरिकांच्या बोअरवेलमध्ये मुरत असल्याने पाण्याला उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे अनेक नागरिक बोलत आहेत, तर उड्डाणपुलाचे काम थांबलेले असल्यामुळे येथून पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, चालू वर्षात सुद्धा ह्या उडान पुलाच्या कामाचा मुहूर्त येतो किंवा नाही, या विवंचनेत भोकरची जनता सापडली आहे, हा उड्डाणपूल म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा  झालेला आहे, उभ्या असलेल्या गजाळ्या गंजून जात आहेत, तीन वर्षापासून अर्धवट स्थितीमध्ये असलेला हा उड्डाणपूल आता म्हातारा होत असल्याची भावना भोकर येथील नागरिक व्यक्त करत आहेत, त्यामुळे ह्या उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करून भोकर येथील नागरिकांना व वाहनधारकांना होणारा त्रास थांबविण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.