भोकर :(रमेश गंगासागरे ) कोरोना सारख्या जागतिक महामारीतही भोकर शहरात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबातील नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचा डब्बा पुरवून आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
भोकर शहरात हातावर पोट असणाऱ्या व मजुरी करून जीवन जगणार्या असंख्य कुटुंबांना आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने भोकर शहरातीलच काही सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांकडून दोन वेळच्या जेवणाचा तयार डब्बा पुरवून कर्फ्यू मध्ये सुद्धा माणुसकीचे दर्शन घडविले असल्याने त्यांचे सोशल मीडिया वरून जोरदार अभिनंदन केले जात आहे.



0 Comments