भोकर : (रमेश गंगासागरे ) कोरोना वर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यू चे काटेकोरपणाचे पालन करून भोकर येथील जनतेने अभूतपूर्व एकतेचे दर्शन घडवले आहे तसेच संध्याकाळी ठीक पाच वाजता थाली  नाद करून व टाळ्या वाजवून कर्फ्यू मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, नर्स, सैनिक यांचे स्वागत केले आहे.
                 
       चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोना मुळे सध्या जगात सगळीकडे हाहाकार माजला असून, कोणत्याच देशात सध्या कोरोनाचे जिवाणू मारण्यासाठी लस तयार करण्यात आली नसल्याने सगळेजण खबरदारीचा उपाय घेण्यासाठी सूचना करत आहेत, अशातच कोरोणाचा प्रसार होऊ नये यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 22 मार्च रोजी रविवारी दिवसभर जनता कर्फ्यू लावला असून कर्फ्यू ला भोकर वासियांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सकाळी सहा वाजल्यापासूनच भोकर शहरातील अनेक रस्त्यावर सन्नाटा पसरला होता, वाहतूक पूर्णतः बंद होती, नागरिकही आप -आपल्या घरात राहणे पसंत केले होते, संध्याकाळी ठीक पाच वाजता सर्व नागरिकांनी थाळीनाद करून कोरोणा मध्ये काम करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी थाळी नाद केल्याचा आवाज भोकर शहरातील अनेक गल्लीबोळातून ऐकावयास येत होता.
     

       हा जनता कर्फ्यू सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत लागू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी स्पष्ट केले आहे, त्यामुळे राज्यात कलम 144 लागू असल्याने कोणताही नागरिक गर्दी करू नये, किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी थांबू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे अनाउन्समेंट करण्यात येत होती.