भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आज दिनांक 14 मार्च रोजी माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास मुराद मिया मांजरमकर,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कदम, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब पाटील, रावणगावकर, डॉक्टर शहनाज बेगम, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांमधून देशसेवेत काम करणारे पाच जवान एक नायब तहसीलदार एक वनरक्षक अकरा पत्रकार दहा वकील मंडळी डॉक्टर शिक्षक आणि प्राध्यापक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी मार्गदर्शन केले.
सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मीरा जोशी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेक प्राध्यापक मंडळींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0 Comments