भोकर : (रमेश गंगासागरे ) फुले दाम्पत्याने त्याकाळी अत्यंत हाल-अपेष्टा सहन करून शिक्षणाचा पाया रोवला सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवाची परवा न करता मोठे प्रयत्न केले त्यामुळेच आजच्या महिला स्वाभिमानाने जीवन जगताना दिसून येत आहेत असे प्रतिपादन भोकर येथील जिल्हा न्यायाधीश श्री एम शेख यांनी केले.

       आज दिनांक 12 मार्च रोजी भोकर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तालुका विधी सेवा समिती पंचायत समिती कार्यालय आणि वर्ल्ड विजन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश श्री एम एस शेख हे होते कार्यक्रमास न्यायाधीश श्री पांडे न्यायाधीश सौ तळेकर नायब तहसीलदार श्री पांडे पंचायत समितीचे कर्मचारी आणि वर्ल्ड व्हिजन असंख्य कर्मचारी उपस्थित होते न्यायमूर्ती शेख पुढे म्हणाले की त्या काळात जर फुले दांपत्यांनी हाल-अपेष्टा सहन केल्या नसत्या तर आज महिला शिकून सवरून पुढे गेल्या नसत्या आज अनेक क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत असंख्य महिला उच्च शिक्षण घेऊन अधिकारी झालेल्या आहेत त्या केवळ फुले दांपत्यांनी केलेल्या त्यागामुळे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचाल शैला आसंगी यांनी केले, कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांना साडी चोळी व साधार पत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच भोकर येथील न्यायालयात कार्यरत सर्व महिला वकिलांचे पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास तालुका भरातून हजारो महिलांची उपस्थिती लाभली होती.