भोकर :(संदिप गंगासागरे ) भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे तालुका सचिव संतोष नरवाडे यांच्या नवीन रेडीमेड कापडाच्या दुकानाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .

       आज सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान बस स्टँड रोडवरील संतोष नरवाडे यांच्या "साईश्री मेन्स वेअर" चे उद्घाटन श्री पप्पू पाटील बोलेवार आणि अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक श्री रमेश गंगासागरे, यांच्या शुभहस्ते उद्घाटन पार पडले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नवीन दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी नरवाडे यांनी ग्राहकांना नेहमीच खुश ठेवणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले, आणि शर्ट व पॅन्ट घेणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांनी एकावर एक फ्री योजना ग्राहकांसाठी चालू केली आहे नवीन दुकानांमध्ये भरपूर व्हरायटीज त्यांनी उपलब्ध केले असून पहिल्याच दिवशी ग्राहकांची मोठी झुंबड दिसून येत आहे.
        एकावर एक फ्री योजना तेही अल्पदरात अमलात आणल्याने ग्राहकही खुशी खुशी ने खरेदी करताना दिसत आहेत. यावेळी तालुका मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष राजेश्‍वर रेड्डी लोकावाड, नगर परिषदेचे कर्मचारी साहेबराव मोरे, दत्ता रेड्डी, पत्रकार उत्तम बाबळे, पत्रकार बालाजी नारलेवाड, पत्रकार अरुण डोईफोडे, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार सुभाष तेले, गंगाप्रसाद समुद्रवाड, हिंगोली येथील मानकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पुपलवाड, दत्तात्रेय गंगासागरे, सामाजिक कार्यकर्त्या सुलोचनाबाई ढोले, सुरेश गंगासागरे, बालाजी गंगासागरे यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.