भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर येथील प्रतिष्ठित डॉक्टर पुरुषोत्तम कल्याणकर हे भोकर नगरपरिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 18 मधून निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

       डॉक्टर पुरुषोत्तम कल्याणकर हे ॲडव्होकेट व्यंकटराव कल्याणकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. व्यंकटराव कल्याणकर हे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आदेशाने मुंबई येथे मोपेकचे चेअरमन पद भूषविले होते, ते शंकरराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर पुरूषोत्तम कल्याणकर यांना मागील कार्यकाळात अशोकराव चव्हाण यांनी भोकरनगर परिषदेमध्ये संधी देऊन काँग्रेसचे नगरसेवक केले होते, आता वार्ड क्रमांक 18 ओपन पुरुषासाठी राखीव असल्याकारणाने डॉक्टर कल्याणकर हे त्याच वार्डातील स्थानिक रहिवाशी असल्याने त्या वार्डातील डॉक्टर पुरुषोत्तम कल्याणकर हे निवडणूक लढवावी अशी आशा येथील नागरिक व्यक्त करत आहेत, त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी आदेश दिल्यास वार्ड क्रमांक 18 मधून निवडणूक लढवणार असल्याचे डॉक्टर कल्याणकर यांनी भोकर न्यूज लाईव्हला कळविले आहे. मागील काळात डॉक्टर कल्याणकर यांनी निवडून आलेल्या वार्डात अनेक विकास कामे केलेली असल्याने भोकरची जनता त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे कळते.