भोकर :(रमेश गंगासागरे )भोकर तालुक्यातील पांडुरना साळवाडी येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी शिंदे यांचे दोन भाऊ माधव शिंदे व रामकिशन शिंदे यांच्यावर शेत जमीन बळकावण्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून यात बालाजी शिंदे यांना अटक झाल्यानंतर मुख्याध्यापक माधव शिंदे आणि सहशिक्षक रामकिशन शिंदे हे दोघे फरार झाले आहेत.

       घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, पांडुरना येथील मुख्य रस्त्यावरील घाटा लगत बालाजी शिंदे यांची शेत जमीन आहे, या शेतजमिनीला लागूनच फिर्यादी माधव अर्जुन गायकवाड यांची 3 हेक्‍टर 77 आर शेत जमीन आहे, ही लाख मोलाची जमीन कवडी मोल दराने घेण्यासाठी अनेक वेळा बालाजी शिंदे आणि त्यांचे दोन सख्खे भाऊ माधव शिंदे (मुख्याध्यापक) आणि रामकिशन शिंदे (सहशिक्षक) यानी फिर्यादी वर अनेक वेळा दबाव टाकला होता, फिर्यादीला ही जमीन विक्री करायची नसल्याने त्यांनी शिंदे बंधूंना ही जमीन विकण्यास नकार दिला, तेव्हा शिंदे बंधुंनी फिर्यादीस अनेक वेळा भांडणे केली, त्यामुळे फिर्यादीने 2019 मध्ये न्यायालयात दावा क्रमांक 31 / 2019 दाखल केला, तेव्हा न्यायालयाने फिर्यादीच्या बाजूने निकाल देत शिंदे बंधूंना फिर्यादीच्या शेतात जाण्यास मज्जाव केला, असे असतानाही बालाजी शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता फिर्यादीच्या शेतामधून स्वतःच एक मोठा नाला काढला व शेतीचे विभाजन करून स्वयंघोषित सीमारेषा आखून टाकली, त्यामुळे आरोपी आणि फिर्यादीत मोठ्या प्रमाणावर भांडणे झाली, फिर्यादीने न्याय मिळण्यासाठी ॲडव्होकेट वैभव गायकवाड यांच्यामार्फत कोर्टाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा जिल्हा न्यायाधीश एम.एस.शेख यांच्या कोर्टाने 156 (3 ),  कलम 323, 506 आणि 34 नुसार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत शिंदे बंधू वर, गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले, त्यावरून भोकर पोलीस स्टेशन मध्ये तीनही शिंदे बंधू वर गुन्हे दाखल झाले होते, या गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी केला असून काल दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पांडुरना येथील आश्रम शाळेमधून बालाजी शिंदे यांस अटक करण्यात आली आहे, तर मोठ्या बंधूंना अटक झाल्याचे कळताच माधव शिंदे आणि रामकिशन शिंदे हे घटनास्थळावरून फरार झाल्याचे कळते.