भोकर :(रमेश गंगासागरे ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संघर्ष युवा प्रतिष्ठान भोकरच्या वतीने भव्य निबंध स्पर्धा दि: 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती त्यात 351 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याचे आज दि: 25 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथे मोठया थाटात पार पडले.
       प्रथम क्रमांक दुर्गा दत्ता गोत्रे (शाहू महाराज विद्यालय), या विद्यार्थिनीला सायकल व प्रमाणपत्र, द्वितीय योगेश्वरी संतोष सुर्यवंशी (मंजूळाबाई किन्हाळकर मुलिचे विद्यालय), स्टडी टेबल व प्रमाणपत्र ,तृतीय वैष्णवी शेषेराव राठोड (मंजूळाबाई किन्हाळकर मुलिचे विद्यालय), शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविन्यात आले.

       यावेळी शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख सावंत, सलीम सर, सर्व शिक्षक विद्यार्थि व संघर्ष युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थीत होते.