भोकर (रमेश गंगासागरे ) आज दुपारी भोकरच्या रेल्वे स्टेशन मध्ये इंटरसिटी ने आदिलाबादकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
       घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की नांदेड ते आदिलाबाद कडे जाणारी दुपारची इंटरसिटी भोकर रेल्वेस्टेशनवर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर  येणार असल्याची अनाउन्समेंट स्टेशन मास्टर ने केली असल्याने, काही प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबले पण, सदरील गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर न येता, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 च्या मध्ये असणारी डायरेक्ट लाईनवर येऊन थांबली आसल्याने अनेक वयोवृद्ध महिला व बालकांना विनाकारण चार फूट खोल  असलेली पटरी ओलांडून सदरील गाडीमध्ये  जावे लागले, असे असतानाच काही वेळातच नागपूर ते मुंबई जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस भोकर प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची अनाउन्समेंट स्टेशन मास्टरने केली तेव्हा, इंटरसिटी मध्ये बसणाऱ्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडून उतरून मध्यभागी थांबलेल्या गाडीत चढताना अनेक वयोवृद्ध नागरिक, महिला व बालक अक्षरशा गिट्टीवर पडल्याने अनेक जणांना दुखापत झाल्याचे समजले, एवढ्यात नंदिग्राम एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येऊन थांबल्याने अनेक प्रवाशांना उड्डाणपुलावर जाऊन पुन्हा चार फूट खोल असलेली पटरी ओलांडून गाडीत चढून बसावे लागले, त्यामुळे भोकर स्टेशन मास्टरच्या या चुकीमुळे अनेक प्रवाशांचे बेहाल झाले, काही प्रवाशांचा जीव दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला असल्याने सदरील स्टेशन मास्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक प्रवासी वर्गातून होत आहे.
       रेल्वेच्या कायद्यानुसार गाडी येताना पटरी ओलांडणे हा गंभीर गुन्हा असल्याने अनेक प्रवासी नियमाचे पालन करतात, पण आज भोकर येथील स्टेशन मास्टर ने घोडचूक केल्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास झाला सामोरे जावे लागले आहे, तर अनेक प्रवासी पटरी ओलांडताना जखमी झाल्यामुळे यास रेल्वे स्टेशन मास्तरला जबाबदार धरून वरिष्ठ पातळीवरून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.