भोकर :(रमेश गंगासागरे ) महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाविरोधात भोकर भाजपच्यावतीने भोकर तहसीलवर एक दिवशीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

       तहसीलदार भोकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती पण या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, सरकार सत्तेवर आल्यास पासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये वाढ झाली असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, भाजपा सरकारच्या कर्जमाफी, पिक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरण, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे 43 लाख खातेधारकांना 19 हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता, तूर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक ह्या सरकारने बदलल्यामुळे केवळ 08:46 क्विंटल प्रति हेक्‍टरी इतकीच खरेदी होत आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारने आश्वासन पाळलेले नाही, महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही फसवणूक करणारी आहे, भाजपा सरकारने अमलात आणलेली शेतकऱ्यांची फायदेशीर कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारने बंद केली, आणि नव्या पोकळ कर्जमाफीची नुसती घोषणा केली, कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांच्या हिताच्या भाजपा सरकारच्या जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, अशा उपयुक्त योजनांना स्थगिती देऊन शेतकऱ्यांना जे मिळत होते ते रोखले असल्याने आम्ही आज सरकारच्या या धोरणाविषयी एक दिवशीय धरणे आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर किशोर पाटील, दिलीप सोनटक्के, गणेश कापसे, राजेश करपे, गणपत पिठेवाड, बाळा साखळकर, श्रीमती अनिता साबळे, बालाजी वाघमारे, माधव पाटील शिंदे, राजू अंगरवार, बालाजी नागमोडे, चंद्रकांत नागमोडे, हरिभाऊ चट लेवार, नंदू भाऊ ऱ्याकावार, माऊली पाटील चिंचाळकर, सुनील शहा, आनंदा डांगे, विजय प्रेमलवाढ,  बालाजी शेळके, आकाश क्षीरसागर, बाळू माने,  तेजस मलदोडे, वैभव टाक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.