वाराणशी :ऊ.प्र.(रमेश गंगासागरे ) संत रविदास यांची शिकवण काळाची गरज असून ही शिकवण तळागाळापर्यंत पोहोचायला हवी असे उद्गार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयोजित कार्यक्रमात केले आहे तसेच त्यांनी संत रविदास यांच्या जन्म ठिकाणाचे दर्शन घेऊन लंगर मध्ये ही सहभाग नोंदवला. 

       चौदाव्या शतकातील महान संत रविदास यांनी जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव नको असे विचार यावेळी मांडले ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, सध्याच्या काळात हिंसाचार आणि द्वेष पूर्ण वातावरण असून अशा वेळी संतांची शिकवण आचरणात आणायला हवी असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे, त्यांच्या विचारांचे पालन करणे ही आता काळाची गरज बनली असे प्रियंका गांधी म्हणाल्या, संत रविदास यांची शिकवण आपल्याला राम आणि रहीम हे एकच असल्याचे सांगितले आपण सर्व एकाच देवाचा अंश आहोत, त्यांच्या शिकवणीतून आपण बोध घ्यायला हवा असेही त्या म्हणाल्या.
 
       तत्पूर्वी प्रियंका गांधी यांचे नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बाबतपुर येथील विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत रविदासिया धर्म संघटनांचे धर्मसंस्थापक तसेच पुणे येथील सुखदेव महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमास देश-विदेशातून जयंती साठी आलेल्या लाखो रविदास अनुयायांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली होती.