नांदेड :(रमेश गंगासागरे ) गुरु रविदास जन्मभूमी वाराणसी येथे जाणारा नांदेड जिल्ह्यातील पहिला जवळपास दोनशे चर्मकार बंधू-भगिनींचा जत्था मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता मनमाडकडे रवाना झाला.
पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजीराव सोनटक्के यांचा प्रत्येक्ष उपस्थित राहून सर्वाना शुभेच्छा दिल्या, त्यांचा यावेळी रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे भोकर तालुकाध्यक्ष पत्रकार रमेश गंगासागरे आणि तालुका सचिव संतोष नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा जत्था मनमाड मार्गे अलाहाबाद, बुद्धगया आणि वाराणसीला जाणार आहे.
निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर सामाजिक कार्यकर्ते नारायणराव सोनटक्के, भगवान अन्नपूर्णे, गोविंद वाघमारे, अशोक गोरे, समता परिषदेचे नारायण वाघमारे, शिवराज कांबळे, शिवानंद जोगदंड, मनोज सुरजकर, विजय उतकर आदींची उपस्थिती होती.
दुसरा जत्था पहाटे रवाना झाला.
वाराणसी यात्रेचा दुसरा जत्था बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखाली नंदीग्राम एक्स्प्रेसने नागपूरला जाणार आहे. दीक्षाभूमीवर अभिवादन केल्यानंतर रात्री समता एक्स्प्रेसने आग्रा येथील रविदास स्तंभ आणि ताजमहाल पाहण्यात येईल. आग्र्याहून रात्री रेल्वेने लखनौ येथे जाऊन सकाळी बहन मायावती यांनी निर्माण केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाहण्यात येईल. सायंकाळी अयोध्येला जाऊन मुक्काम करण्यात येईल व दुसऱ्या दिवशी रात्री वाराणसीला प्रयाण करण्यात येईल. वाराणसी येथे दोन रात्री मुक्काम करून गुरु रविदास जन्मोत्सव साजरा करण्यात येईल.
१० फेब्रुवारी रोजी दुपारी अलाहाबाद कडे प्रस्थान करण्यात येईल. रात्री दीक्षाभूमी एक्स्प्रेसने निघून दोन्ही जत्थे १२ फेब्रुवारी रोजी पहाटे नांदेडला येणार आहेत.

0 Comments