भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात 25 फेब्रुवारीला पदवी वितरण कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमास माजी मंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि परीक्षा संचालक डॉ रवि सरोदे, डॉ पी डी जाधव, प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांच्या उपस्थितीत पदवी वितरण होणार आहे.
       शै. वर्ष 2018-19 मध्ये सामाजिक  (कला), वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षणक्रम पूर्ण करुन पदवी प्रमाणपत्रा साठी आवेदन पत्र (फॉर्म) भरलेल्या सर्व विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते की, मंगळवार, दि. 25/02/2020 रोजी सकाळी 10:00 वाजता महाविद्यालयात येऊन पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी भरलेल्या रक्कमेची पावती आणि ओळख पत्र सोबत आणून आपले नाव नोंदणी करावी. कार्यक्रम ठीक 11:30 वाजता चालू होईल. तसेच जे विध्यार्थी महाविद्यालयात दि. 25/02/2020 रोजी पदवी प्रमाणपत्र घेणार नाहीत त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे अतिरिक्त विलंब शुल्क भरून पदवी प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्या मुळे महाविद्यालयातील पदवी वितरण समारंभास उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र घेण्यात यावे. डॉ माधवराव पाटील किन्हाळकर (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, कै. दिगंबरराव बिंदू स्मारक समिती भोकर), डॉ. रवि सरोदे (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वा. रा. ती. म. वि. नांदेड), डॉ पी डी जाधव, प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र  वाटप करण्यात येणार आहे. डॉ अरविंद सोनटक्के, डॉ अरविद चव्हाण, डॉ व्यंकट माने, डॉ संजय काळे, प्रा.ओम कदम यांनी सर्व पदवी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांनी पदवी वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.