मुंबई :(रमेश गंगासागरे ) रस्त्याच्या कडेला बसून दिवसभर बूट पॉलिश करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चर्मकार समाजाच्या 21 वर्षाच्या मुलाने सीजन 11 इंडियन आयडॉल होण्याचा बहुमान पटकावला आहे.
पंजाब च्या भटिंडा येथील एका गरीब कुटुंबात राहत असलेल्या सनी हिंदुस्थानी हा रविवारी इंडियन आयडॉल 11 चा विजेता ठरला आहे, भटिंडा येथील अंतर्राज्यीय बस टर्मिनलच्या बाहेर बूट पॉलिश करून सनीने आपले कुटुंब चालवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो, त्यास गाणे गाण्याची आवड असल्याने कोण्यातरी गायक असलेल्या नागरिकाने त्यास इंडियन आयडॉल मध्ये आपले नशीब अजमावण्यासाठी मार्गदर्शन केले होते, सनीने इंडियन आयडॉल मध्ये प्रथम- द्वितीय चाचण्या पास करून सर्व श्रोत्यांची मने जिंकली होती, त्यामुळे त्यास पुढील फेर्यांसाठी पात्र ठरविण्यात आले होते, त्याने आपल्या मधुर आवाजाने संबंध भारतवासीयांचे मने जिंकल्याने त्यास इंडियन आयडॉल होण्याचा बहुमान मिळाला आहे, त्यास रविवारी एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सह 25 लाखांचे बक्षीस, एक कार आणि गाण्याचे कंत्राट दिले आहे, द्वितीय उपविजेत्या रोहित राऊत आणि अंकोना मुखर्जी यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये जिंकले आहेत.
इंडियन आयडॉल होण्याचा बहुमान पटकाविणाऱ्या सनीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्याचे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने इंजिनीयर चंद्रप्रकाश देगलूरकर, पत्रकार रमेश गंगासागरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष नरवाडे, पत्रकार उत्तम बाबळे, पत्रकार हिरे, पत्रकार अरुण डोईफोडे, पत्रकार सिद्धार्थ जाधव यांच्यासह असंख्य जणांनी सोशल मीडिया वरून सनीचे अभिनंदन केले आहे.

0 Comments