भोकर (रमेश गंगासागरे ) रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नूतन शाळेच्या मैदानावर युवा पॅंथर च्या वतीने "आंबेडकरी जलसा" चे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांतिवीर शहीद पोचीराम कांबळे शहीद गौतम वाघमारे या सारख्या अनेक आंबेडकरी वीर यांच्या क्रांतिकारक नामांतर लढ्यातून मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण विस्तार झाले त्या गौरवशाली लढ्याची ज्योत निरंतर प्रज्वलित रहावी यातून खऱ्या अर्थाने युवापिढी आंबेडकरी लढ्याची प्रेरणा मिळावी म्हणून भोकर येथील युवा पॅंथर या सामाजिक लढाऊ संघटनेकडून भव्य आंबेडकरी जलसा चे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एम सायलू म्हैसेकर तेलंगणा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल प्रधान संघटना प्रमुख युवा पॅंथर हे राहणार आहेत, सदरील कार्यक्रमासाठी नामदेव आयलवाड, केशव मुद्देवाड, बाली भाऊ कांबळे, प्राध्यापक जाधव, संजय घंटलवार, दिनेश लोंढे पाटणकर, राहुल चौदंते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी रविवारी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहिर सविधान मनोहरे अमरावती यांचा भीम भिम गितांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजक संदीप गायकवाड यांनी दिली आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र दुधारे, प्रकाश जाधव, प्रेम गायकवाड, विजय उर्फ पिल्लू दवणे हे प्रयत्न करत आहेत.

0 Comments