भोकर :(रमेश गंगासागरे ) नागरिकता संशोधन अधिनियम 2019 ला पाठींबा देने, ह्या कायद्या बाबद गैरसमज दूर करून कायदा काय आहे हे जाणून घेण्यासाठी रविवारी सकाळी 10 वाजता भोकर तहसीलवर भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनही देशात धर्माच्या नावावर तेथील अल्पसंख्यांक (हिंदू, बौद्ध, जैन, शीख, इसाई आणि पारशी) यांना धर्म परिवर्तन व धार्मिक अत्याचारास कंटाळून गेलेल्या बांधवांना चांगले जीवन व सन्मान देण्यासाठी हे अधिनियम तयार केले गेले आहे, 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात असलेल्यांना नागरिकता प्रदान करण्यात येणार आहे, त्यामुळे त्यांना सर्व सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे, 31 डिसेंबर 2014 नंतर आलेल्या नागरिकांना
पाच वर्ष भारतात रहावे लागणार आहे त्यानंतर त्यांना भारताची नागरिकता मिळणार असल्याचे सूतोवाच केंद्र सरकारने नुकतेच केले आहे, अधिकृत पुरावे सादर केल्यानंतर जगातील कोणताही मुस्लिम अथवा अन्य व्यक्ती भारताची नागरिकता घेण्यासाठी अवेदन करू शकतो, त्यावर कसल्याही प्रकारची बंधने नाहीत, 2014 पासून जगातील 566 मुस्लिमांनी भारताची नागरिकता घेतली आहे, राजकारणामुळे या चांगल्या कायद्याच्या विरुद्ध भ्रम, अफवा पसरवल्या जात आहेत, ते चुकीचे आहे, आपण कशाचा विरोध करत आहोत याचे भान राहिले नाही, देशाच्या विरोधात नारे लावणे, जाळपोळ करणे, दगडफेक करणे, हे खऱ्या भुमिपुत्राला शोभत नाही, किंवा राष्ट्राची संपत्ती नष्ट करणारा तो भारतीय नागरिक असू शकत नसल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, या कायद्याबाबत काही नागरिक संभ्रम निर्माण करत असल्याने, हा कायदा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी उद्या दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी सकाळी महादेव मंदिर येथे सर्व राष्ट्रप्रेमीनी जमण्याचे आवाहन भोकर येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली आहे, हा मोर्चा महादेव मंदिर येथून सकाळी 10:30 वाजता निघून गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्गे तहसील कार्यालयावर येईल याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होणार असल्याने जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदरील मोर्चाच्या अनुषंगाने भोकर शहरातील विविध भागात मोठे मोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आयोजक परिश्रम घेत असल्याचे यावेळी दिसून आले, तर काही राष्ट्रप्रेमी नागरिक आपल्या मित्रांना उद्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करत फिरल्याचे दिसून आले आहे.


0 Comments