नांदेड :(रमेश गंगासागरे ) भोकर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे भोकर पंचायत समितीचे माजी सभापती तथा भोकर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक गोविंद बाबा गौड पाटील यांना नांदेड येथे नुकतेच समीक्षा कर्तृत्व सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गोविंद पाटील

       मिमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, दैनिक समीक्षा, ह्यूमन राइट्स फाउंडेशन आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, विविध क्षेत्रातील  मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, यावर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 16 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यात भोकर तालुक्यातील एकमेव व्यक्ती गोविंद बाबा गौड पाटील यांना सन्मानित करण्यात आले असल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार त्यांना नांदेड येथील मिनी सह्याद्री रेस्ट हाऊस येथे दिनांक रस्त हाऊस येथे दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे, राज्याचे माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, गोविंद बाबा गौड पाटील यांचे भोकर न्यूज लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.