भोकर : (रमेश गंगासागरे ) तालुक्यातील कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात सी.आय.टी.यु. तर्फे भोकर तहसीलवर आज सकाळपासून एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

        कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून सिटू या संघटनेकडे बघितले जाते, आज दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी भोकर तहसील पुढे या संघटनेतर्फे अंगणवाडी कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, महाराष्ट्र आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी तसेच सर्व असंघटित कामगार कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात तहसील पुढे एक दिवसीय जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
       यात अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व गटप्रवर्तक, बांधकाम कर्मचारी, शालेय पोषण आहार, कर्मचारी तसेच असंघटित कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला हे सर्व कर्मचारी आज 8 जानेवारी रोजी आपले कामकाज बंद ठेवून कामकाज बंद ठेवून एक दिवसीय संप पुकारला होता या एक दिवसीय संपाचे नेतृत्व कॉम्रेड शिवाजी गायकवाड, दिलीप पोत्रे यांनी केले. धरणे आंदोलनाच्या शेवटी तहसीलदार यांना संघटनेच्यावतीने पाच पानाचे पत्र देण्यात आले आहे.