नांदेड :(रमेश गंगासागरे ) येथील श्री गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय, नांदेड येथे दि. 06 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विकास कदम तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शेखर घुंगरवार होते. त्यांनी महाविद्यालयातील माध्यमशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पत्रकारिता म्हणजे काय ? तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी माध्यमांचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, व त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे, इत्यादी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रा. विपिन कदम प्रा. अमोल धुळे प्रा. संजय नरवाडे प्रा. गुणवंत सरोदे व तसेच महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


0 Comments