भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील पंचायत समितीच्या सभापतीपदि सौ.निता व्यंकटेश रावलोड तर उपसभापती पदि नागोराव गुणाजी कोठूळे दोन्ही काँग्रेसचे सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज सोमवार दि,6 जानेवारी रोजी पंचायत समितीमध्ये पीठासीन उपविभागीय अधिकारी श्री, पवन चांडक,उपपीठासीन अधिकारी तहसीलदार श्री, भरत सूर्यवंशी यांच्या समोर दोनच अर्ज आल्याने त्यातूनच त्यांनी सभापती व उपसभापती यांची निवड केली. भोकर पंचायत समितीत एकूण सहा सदस्य आहेत,असे असताना सभापती पदासाठी पिंपलढव गणातून निवडून आलेल्या सौ.रावलोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी भोसी गणातून निवडून आलेले कोठूळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध व अत्यंत शांततेत पार पडली. निवड होताच बाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके व ढोल ताशे वाजवून आनंद साजरा केला. यावेळी प.स.सदस्य माजी सभापती सौ.झिमाबाई चव्हाण, सुर्यकांत बिल्लेवाड, जगदीश पाटील भोसीकर, रामचंद्र मुसळे, सुभाष कदम, सौ.सागर जाधव यांची उपस्थिती होती. निवडी नंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापतीचे ,प्रकाश देशमुख भोसिकर, सुर्यकांत चिंचाळकर यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

0 Comments