भोकर :(रमेश गंगासागरे )महाविकास आघाडीवर नागरिकांनी जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ करून राज्यातील खुंटलेल्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे उदगार त्यांनी नागरी सत्कार समितीच्या मंचावरून काढले.
दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान भोकर येथील नवा मोंढा मैदानावर भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डी पी सावंत हे होते, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भोकर मतदारसंघाच्या माजी आमदार सौ अमिता भाभी चव्हाण, अमर भाऊ राजूरकर, माजी आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील, महापौर धबाले, पप्पू कोंडेकर, श्याम पाटील अमराबादकर, रावसाहेब अंतापूरकर, बाबाराव एंबडवार, आनंदराव पाटील मांजरीकर, नगराध्यक्षा संगीता चिंचाळकर, ताहेर बेग, हमीद खान पठाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात नागरी सत्कार समितीतर्फे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांचे तीस फुटाच्या पुष्पहाराने भव्य स्वागत करण्यात आले होते हे विशेष, पुढे बोलताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीतर्फे नांदेड जिल्ह्याच्या रस्ते कामांना प्राधान्य दिले जाईल, यासोबतच राज्यातील रस्त्यांच्या विकास कामाला प्राधान्य क्रमाने पाहिले जाऊन, महाराष्ट्र राज्य हे नंबर एकचे राज्य झाले पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली, या सोबतच भोकर तालुक्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि बांबू प्रशिक्षण प्रकल्पाचे कामही काही दिवसातच सुरू करुन आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले, या सोबतच 67 पाणी पुरवठा योजनेच्या कामांना मी मंजुरी दिले असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले आहे, भोकरसह राज्यातील सीमा भागाकडे सुद्धा विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश पाटील भोसीकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मुसळे यांनी केले तर आभार मनोज गिमेकर यांनी मांनले, कार्यक्रमास भोकर मतदारसंघातून असंख्य महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती.

0 Comments