भोकर :(रमेश गंगासागरे )  पोलीस ठाण्यातील सह पोलीस निरीक्षक श्री सुरेश भाले यांची भोकर येथून मुदखेड पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांना ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी व पत्रकार बांधवांच्या वतीने दि.२६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी भोकर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रम घेऊन निरोप देण्यात आला.
   सपोनि.श्री सुरेश भाले हे गेल्या तीन वर्षापासून भोकर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारुन आपल्या प्रामाणिक कामाची छाप भोकर वासियावर व ठाण्यातील कर्मचाऱ्यावर तशेंच विशेष करून पत्रकारावर टाकली होती. ते संबंध तालुक्यात एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सुपरिचित होते. त्यामुळे सर्वांच्या अंतकरणात त्यांच्याविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली होती.
         त्यांची नुकतीच मुदखेड पोलीस ठाण्यात बदली झाल्यामुळे भोकर पोलीस ठाण्यातील कर्मचारी व पत्रकार बांधवा तर्फे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांनी सर्वां तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन येथोचित गौरव करून त्यांना निरोप दिला. या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव व पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.