भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर येथील नूतन शाळेच्या प्रांगणात दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता देशातील सद्य स्थिती आणि आपल्या जबाबदाऱ्या या विषयावर भव्य चर्चासत्र, जेरे ऐतेमाम कुलजमाती तहेरीक भोकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
     
        सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील मौलाना मुक्ती सय्यद,भोकर येथील पंचायत समितीचे माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील, भिम शाहीर साहेबराव येरेकर, भिमशाहिर बाबुराव गाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, नागोराव शेंडगे, पत्रकार हिरे, भीमराव दुधारे, मिलिंद गायकवाड, ॲड. सलीम भाई, ॲड. मुजाहिद, भन्ते कीर्ती आनंद, नगरसेवक युसूफभाई, म.इलियास, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, सदरील कार्यक्रमात एन.आर.सी, एन.पी.ए, आणि सी.ए.ए. यामुळे देशातील बिघडत चाललेली स्थिती, यावर अनेक मान्यवरांनी विस्तीर्ण असे आपले विचार व्यक्त केले.
        केंद्र शासनाने देशात वाढत चाललेली बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, ढासळत चाललेली आर्थिक स्थिती, महागाई, यावर गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे असताना, सरकार ह्या विषयाला बाजूला ठेवून, दुसऱ्याच विषयाकडे घेऊन जाऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्यामुळे देशात अस्थिरतेची भावना निर्माण होत असल्याचा सूर या चर्चासत्रामध्ये निघाला आहे, सदरील कार्यक्रमास भोकर व भोकर तालुक्यातील असंख्य संविधान प्रेमी नागरिक उपस्थित होते.