भोकर : (रमेश गंगासागरे ) घटनेबाबत भोकर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोकर येथील चिखलवाडी भागातील मुकुंद मरीबा धोत्रे यांच्या मालकीची डिस्कवर मोटर सायकल क्रमांक एम.एच. 26, 62 83 ही त्यांच्या घरासमोर लावलेली गाडी, रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद मुकुंद धोत्रे यांनी भोकर पोलीस स्टेशनला दिल्यावरून
भोकर पोलिसांनी CR no, 29/ 2020 कलम 379 नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असता, भोकर येथील एक चोरटा नामे राहुल राहणार जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे शेख फरीद नगर भोकर, यास नांदेड येथेल गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नांदेड येथे रंगेहात पकडून त्याच्याकडून सदरील मोटारसायकल जप्त केली असून, चोरट्याला अटक करून त्या चोरट्यास भोकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, तर दुसरा अल्पवयीन चोरटा भावन्या रा.चिखलवाडी भोकर हा फरार झाला आहे, सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कारामुंगे हे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.

0 Comments