भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील तहसील कार्यालयाच्या पुढे आज सोमवार दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी सकाळी सावली प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी न्यायमूर्ती श्री,शेख यांनी वरील उदगार काढले.
     
सदरील वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सावली प्रतिष्ठानच्या सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील, वनविभागाचे अधिकारी अशिष हिवरे, डॉक्टर उत्तम जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड, पत्रकार बी.आर.पांचाळ, बाबुराव पाटील, रमेश गंगासागरे, सिद्धार्थ जाधव, विलास हटकर, माधव मेकेवाड, मंडळ अधिकारी शेख लतीफ, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती पुढे बोलतांना न्यायमूर्ती शेख म्हणाले की वृक्षारोपण नंतर कोणीच वृक्षसंवर्धन करत नसतात असे वृक्षसंवर्धन काही कामाचे नसते तर लावलेल्या वृक्षांची जोपासना करून वृक्षसंवर्धन करणे आता काळाची गरज असल्याचे ते म्हणाले मी कोकणात असताना पावसाळा दररोज असायचा तेथील नागरिक नेहमी छत्री घेऊनच घराच्या बाहेर पडत असे हे सर्व वृक्षसंवर्धन यामुळे शक्य झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच सावली प्रतिष्ठानचा उपक्रम पाहून त्यांनी पुढील कार्यासाठी सावली प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.