नांदेड :(रमेश गंगासागरे )  राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले  राजमाता जिजाऊ यांची जयंती बहन  कुमारी मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे आज रविवारी दि. १९ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ वाजता महिलांसाठी प्रबोधन व स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
         
        चर्मकार समाज महिला जयंती महोत्सव संयोजन समिती नांदेडच्या वतीने भावसार चौक, मालेगाव रोड, नांदेड येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात आज रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ वाजता सर्व महिलांसाठी भव्य सामाजिक प्रबोधन, स्नेहमिलन व हळदी - कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
          या कार्यक्रमाचे उदघाटन कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथील सेवानिवृत्त शिक्षण संचालिका डॉ. जनाबाई वाघमारे, यांच्या हस्ते होणार असून यवतमाळ येथील सुप्रसिद्ध प्रबोधनकार ऍड. संजूताई गभणे यांचे मुख्य प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. गंगामनी खंदारे गिरगांवकर ह्या राहणार आहेत.
            अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. अनिता चंद्रप्रकाश देगलूरकर, सौ. शालिनी भगवान कांबळे, सौ. रत्नमाला दत्ता खंदारे, सौ. संगीता राम जोगदंड ह्या प्रमुख वक्त्या म्हणून तर सौ. सुमन तुकाराम टोम्पे, सौ. मंजुषा पद्माकर बाबरे, सौ. रेखा साहेबराव धनगे, सौ. मनिषा विठ्ठलराव कांबळे, सौ. शोभा शंकरराव शेळके यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चर्मकार समाज महिला जयंती महोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्षा सौ. मिनाक्षी नारायण वाघमारे ह्या करणार आहेत.
           समितीच्या महासचिव सौ. अंजना अरुण तुरोरीकर ह्या प्रास्ताविक करणार आहेत तर सौ. विद्या अरुण उकंडे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन आणि सौ. चंद्रप्रभावती बालाजी वावडे ह्या आभार मानतील. या कार्यक्रमास सर्व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या कार्याध्यक्षा सौ. कुसुमताई गणेश गायकवाड, उपाध्यक्षा सौ. संजीवनी बापुराव वाघमारे, सौ. मनिषा ज्ञानेश्वर महापुरे, सचिव सौ. शांताबाई अनिल उकंडे, सहसचिव सौ. सुरेखा विठ्ठल उकंडे, सौ. डिम्पल अभिषेक साळे आणि कोषाध्यक्षा सौ. शिंपल हणमंत उतकर आदींनी केले आहे.