भोकर :(रमेश गंगासागरे ) दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान एका मालवाहू ट्रकने भर चौकात वृद्धास चिरडल्याने वृद्ध जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हाजी मिर्झा वाहेद बेग रहिम बेग
       घटनेबाबत कळालेली माहिती अशी की, दिनांक 16 जानेवारी रोजी भोकरचा आठवडी बाजार असल्याने भोकरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठी गर्दी झाली होती, या गर्दीतून किनवट कडून नांदेड कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच. 26 एडी 14 77 चा चालक निष्काळजीपणाने आपले वाहन चालवून, हाजी मिर्झा वाहेद बेग रहीम बेग वय 80 वर्षे राहणार सहिद नगर भोकर, यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.
अपघातस्थळी जमलेली गर्दी
       चौकात अपघात होताच शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन वृद्धास वाचवण्याचा प्रयत्न केला पण, ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला होता, गर्दीचा फायदा घेऊन ट्रक चालक घटनास्थळावर ट्रक सोडून  पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत, ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मयत इसम काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष ताहेर भाई बेग यांचे ते वडील तर गृहरक्षक दलातील जवान (होमगार्ड) फहीम बेग यांचे ते आजोबा होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.