भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर तालुक्यातील मौजे पाकि या गावातील जळीत पीडितांना नांदेड येथील साईप्रसाद परिवाराकडून भरीव आर्थिक मदत मिळाल्याने जळीत कुटुंबीयांना मायेचा आधार मिळाल्याची प्रतिक्रिया भोकर शहरातून मिळत आहे.

       भोकर तालुक्यात असलेल्या धुळदेव मौजे पाकी येथे दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीत मारूती रामचंद्र तमलवाड यांचे घर पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संसार उपयोगी साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, अंथरूण-पांघरूण, घरात ठेवलेला कापूस, पैसे, खाण्यापिण्याचे साहित्य, जळून भस्मसात झाले होते, तर तमलवाड यांच्या घराला लागूनच असलेले रामदास यांचे घर सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, पण दैव बलवत्तर म्हणून रामदास आडे यांचे फारसे नुकसान झाले नाही, तसेच या घटनेत जीवितहानी झाली नाही, घटनेचे गांभीर्य ओळखून धुळदेव येथील ग्रामस्थ तात्काळ आग विझवण्यासाठी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला, धुळदेव येथे लागलेल्या आगीचे वृत्त भोकर येथे पसरताच भोकर येथून आग विझवण्यासाठी एक अग्नीबंब रवाना करण्यात आला होता, या आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या मारुती तमलवाड आणि रामदास आडे ह्या दोन कुटुंबीयांचा निवारा आगीने गिळंकृत केला होता, त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे साहित्य उरले नव्हते, त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून
       नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या व अनेक सामाजिक कार्यात सहभाग असलेल्या साईप्रसाद परिवाराने दिनांक 15 जानेवारी रोजी मौजे पाकी तांडा येथे येऊन, मारुती तमलवाड आणि रामदास आडे ह्या दोन कुटुंबियांना संसार उपयोगी साहित्य, दीड ते दोन महिने पुरेल एवढे किराणा सामान, उबदार कपडे, घरावरील टिनपत्रे, आदी साहित्य देऊन माणुसकीची शाल पांघरली असल्याने साईप्रसाद परिवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.