भोकर :(रमेश गंगासागरे ) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथिल एका नराधमाने 2 वेगवेगळ्या जातीमधील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यास दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवत तिहेरी मरेपर्यंत जन्मठेप व मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला आहे.
घटने बाबद मिळालेली माहिती अशी की, हिमायतनगर येथे दि, 16 मार्च 2019 रोजी घडलेल्या दुहेरी, बहुचर्चित बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) प्रकरणात परवाच 8 जानेवारी रोजी एका आठवड्यापूर्वी दोषी ठरविण्यात आलेला आरोपी नामे बालाजी मल्हारी देवकते वय 43 रा.फुलेनगर हिमायतनगर यास आज दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी (पोस्को) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक खटला क्रमांक 10/ 2019 गुन्हा रजिस्टर नंबर 97/ 2019 मध्ये दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम.एस.शेख यांनी दुहेरी जन्मठेप आणि रुपये दहा हजार दंड, तर एका आठवड्यापूर्वीचा खटला क्रमांक 8/ 2019 गुन्हा रजिस्टर नंबर 26 /2019 मध्ये दोषी ठरवून नराधमास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक खटला व कलम 376 मध्ये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे, दोन्ही गुन्ह्यात मिळून तिहेरी मरेपर्यंत जन्मठेप आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, दोन्ही गुन्ह्यात एकूण वीस साक्षीदार तपासण्यात आले होते, या दोन्ही गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे ऍड. रमेश राजुरकर यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून श्री, काकडे यांनी काम पाहिले आहे.

0 Comments