भोकर :(रमेश गंगासागरे ) आज दि, 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विधिसेवा समिती भोकर व अभिवक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमा
ने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
ने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
सकाळी 10 वाजता भोकर जिल्हा व सत्र न्यायालयातून निघतांना या शोभा यात्रेस जिल्हा न्यायाधीश श्री, एम.एस. शेख यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली, या मिरवणुकीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, नगरपरिषदेचे कर्मचारी, वकील मंडळी,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वनविभागाचे कर्मचारी, यांच्यासह लेझीम आणि टाळ मृदंग घेऊन अनेक नागरिक सहभागी झाले होते, ही शोभा यात्रा बसस्थानक, शिवाजीचौक, आंबेडकर चौक, किनवटरोड मार्गे, जिल्हापरिषद शाळेत जाऊन विसर्जित झाली या ठिकाणी दिंडीला जिल्हा न्यायाधीश शेख यांनी समबोधित केले या वेळी शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.


0 Comments