भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील उड्डाणपूलाचे काम सध्या अर्धवट स्थितीत असून बाहेरून शहरात येणाऱ्या उड्डाणपूलाच्या मुखावर योग्य दिशादर्शक नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
भोकर शहरात होत असलेल्या एकमेव उड्डाणपुलाचे काम मागील दोन ते अडीच वर्षांपासून अर्धवट स्थितीत थांबले असल्याने शहर वाशीयांना या रेंगाळलेल्या कामाचा पुरता कंटाळा आला आहे, उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूने होणारे रोडचे काम सुद्धा थांबले असल्याने शहरातील नागरिकांना उडणाऱ्या गिट्टी आणि धुळीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. पूल अर्धवट स्थितीत असल्याने, काही उपाय योजना करणे गरजेचे होते, पण संबंधीताने काहीच उपाय योजना केल्या नाहीत त्यामुळे मागील 3 वर्षांपूर्वी एक ट्रक या उड्डाणपूलावर चढला होता, आणि वरती विद्युत तारेला त्याचा स्पर्शही झाला होता, पण दैव बलवत्तर म्हणून यात विद्युत तार आणि खांबा व्यतिरिक्त कोणाचे काही नुकसान झाले नाही, तेव्हापासून आज पर्यंत या ठिकाणी बाहेरून शहरात येणाऱ्या उड्डापुलाच्या मुखावर संबंधिताने काहीच उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा या अर्धवट पुलावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता भोकर च्या जाणकार नागरिकांत वर्तविल्या जात आहे.
![]() |
| ह्याच ठिकाणी संबंधिताने योग्य उपाय योजना केलेल्या नाहीत |


0 Comments