भोकर :(रमेश गंगासागरे ) केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही मार्गाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भोकर येथील नागरिक सहकार्य करत आज सकाळ पासून भोकर येथील दुकाने, शाळा, कॉलेज व बाजारपेठ बंद ठेऊन बंद मध्ये सहभागी झाले आहेत.
२४ जानेवारीचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी भोकर शहरात मागील दोन दिवसापासून भोकर वासियांना शांततेच्या मार्गाने बंद पुकारण्या बाबत सुभाष तेले, पत्रकार हिरे, नागोराव शेंडगे, भीमराव दुधारे, बाबा खान पठाण, मिलिंद गायकवाड, दशरथ भदरगे, सुनील कांबळे, दत्ताभाऊ डोंगरे, कॉम्रेड शिवाजी गायकवाड, एम आय एम चे जुनेद पटेल, यांच्यासह असंख्य संघटनातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून आवाहन करण्यात येत होते, त्या आवाहनाला भोकरवासी यांनी जोरदार प्रतिसाद दिला असून यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याचे दिसून आले.

बंदमध्ये दवाखाने व औषधी दुकाने वगळता इतर सर्वांनी आपली दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. दुपारी एक वाजेपर्यंत नागरिकांना साधा चहा, पाणी व नाश्ता सुद्धा मिळाला नाही अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी बोलून दाखविली आहे.

0 Comments