भोकर : (रमेश गंगासागरे ) आज दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी मोबीन खान  इनामदार (नांदेड उपाध्यक्ष जमियात उलमा ए हिंद) यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून भारताचे राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन सादर करण्यात आले आहे.

      दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मज्जिद काही जातीयवादी पक्ष व संघटनांनी उध्वस्त केली असल्याने तमाम मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे अशा संघटनेवर व बाबरी मज्जिद पाडणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशा प्रकारची मागणी  ही  करण्यात आली आहे, निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, माननीय उच्च न्यायालयात तमाम मुस्लिमांच्या भावना लक्षात घेऊन आम्हीं फेर याचिका दाखल केली आहे, त्यामुळे जोपर्यंत या याचिकेवरील निकाल लागत नाही, तोपर्यंत बाबरी मस्जिद ची जागा जसीच्या तसी ठेवण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनावर तमाम भोकर वासी यांच्यावतीने मोबीन खान इनामदार यांनी स्वाक्षरी केली आहे.

       सदरील रॅली ही शांततेच्या मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत येऊन तहसीलदारांच्या प्रतिनिधीला निवेदन सादर करून रॅलीची सांगता करण्यात आली, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी बंदोबस्त लावला होता.