भोकर :(रमेश गंगासागरे ) आज शुक्रवार दि, 20 डिसेंबर रोजी भोकरमधील मुस्लिम समाजातील हजारो नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत दुपारी तीन वाजन्याच्या सुमारास भोकर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर भारतीय नागरिकत्व कायद्यास (NRC & CAA) विरोध दर्शविण्यासाठी भव्य मोर्चा काढला होता.
(छाया; संदिप गंगासागरे)

       दुपारी शुक्रवारची नमाज पठण केल्यावर काजी मस्जितीपासून शांततेच्या मार्गाने पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मार्गाने नारे देत, हातात काळे ध्वज, तिरंगा, व अशोकचक्र असलेला निळा ध्वज घेऊन संविधान जिंदाबाद, हिंदू मुस्लिम शिख ईसाई, हम सब है भाई,भाई , मोदी, अमित शहा मुर्दाबाद अश्या घोषणा देत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आला, तिथे जोरदार घोषणाबाजी करून  परिसर दणाणून सोडला  यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले, या सभेत मुस्लिम समाजातील अनेक धर्मगुरूंनी या भारतीय नागरिकत्व कायद्यास कडाडून विरोध करून भाषणे दिली, यावेळी भोकर व भोकर तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
(छाया, संदिप गंगासागरे)
       आज शुक्रवारी मुस्लिम बांधवा तर्फे मोर्चा असल्याने, यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरचे पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांनी तगडा बंदोबस्त लावला होता, मुस्लिम समाजानेही जोशपूर्ण वातावरणात पण शांततेच्या मार्गाने आपला मोर्चा यशस्वी केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, मोर्चा यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजातील अनेक नवयुवक व प्रतिष्ठित नागरिकांनी मोठे सहकार्य केले होते हे विशेष. जाहीर सभेनंतर मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.