भोकर :(रमेश गंगासागरे ) आज दिनांक 14 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी येथील आयटीआय मधील एका गुणवंत विद्यार्थ्याने जीवनातील नैराश्याला कंटाळून आयटीआय परिसरातील एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

       या दुर्दैवी घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, इलेक्ट्रिशन ट्रेड मध्ये शिकत असलेला आकाश पांचाळ वय 18 वर्षे हा लोहा तालुक्यातील रहिवासी असून तो अत्यंत गुणवान व हुशार विद्यार्थी म्हणून ओळखल्या जात होता, तो भोकर येथील आयटीआय मध्ये व्यवसायिक शिक्षण घेत होता, त्यास आई, वडील, बहिण, भाऊ नसल्याचे कळते, आकाश पांचाळ यास बरबडा येथील त्याच्या नातेवाईकांनी त्याचे पालन पोषण करून सांभाळ केला होता, इयत्ता दहावीला त्यास बऱ्यापैकी मार्क्स असल्यामुळे त्याचा इलेक्ट्रिशन ट्रेडसाठी नंबर लागला होता, आणि तो आयटीआय मधील वस्तीगृहात मागील अनेक दिवसापासून राहत होता, वर्गामध्ये अत्यंत हुशार आणि अभ्यासू असल्याचे त्याच्या शिक्षकांनी सांगितले पण आज अचानकच त्याने हा दुर्दैवी मार्ग स्वीकारल्याने आयटीआय परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे, त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उत्तरीय तपासणी करून त्याचे नातेवाईक असलेल्या बरबडा तालुका नायगाव येथे आज रात्री दिनांक 14 डिसेंबर रोजी आठ ते नऊ वाजण्याच्च्या दरम्यान त्याच्यावर जड अंत:करणाने अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी भोकर आयटीआय मधील सर्व शिक्षक, बरबडा येथील असंख्य गावकरी आणि आकाश पांचाळ यांचे मित्र उपस्थित होते.