हैद्राबाद :(रमेश गंगासागरे ) येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलीस इन काउंटर मध्ये ठार झाले आहेत.
       हैदराबाद येथील उच्चशिक्षित जनावरांचे डॉक्टर असलेली डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर काही दिवसापूर्वी चार नराधमांनी तिच्या एकटेपणाचा व अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार करून पेट्रोल टाकून जाळण्याच्या घटनेचे पडसाद संबंध भारतभर पसरल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी हैदराबाद पोलीस बलात्कार घटनेत आरोपी असलेले शिवा, नाविन, अरिफ आणि केशवूलू यांना घेऊन ज्या ठिकाणी पीडितेवर बलात्कार झाला होता त्याच ठिकाणी तपासकामी राष्ट्रीय महामार्ग 44 वर गेले असता तेथून ह्या चारही आरोपींनी पोलिसांना धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी आरोपीच्या दिशेने केलेल्या गोळीबारात वरील चारही आरोपी जागीच ठार झाले, डॉक्टर प्रियंका अत्याचार प्रकरणात संबंध देशवासी यांकडून विविध प्रकारच्या मागण्या पुढे येत होत्या, यातच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन आरोपींना तात्काळ सजा देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात महिला वर्गातून केली जात होती.