भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी अतिभव्य प्रमाणात सर्व रोग आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भोकर चे जिल्हा न्यायाधीश वर्ग-1 यांनी दिली आहे.

       भोकर येथील तालुका विधी सेवा समिती व तालुका अभियोक्ता संघाच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षी प्रमाणे याहीवर्षी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक 8 डिसेंबर रोजी रविवारी न्यायालयाच्या आवारात करण्यात आले आहे, ह्या शिबिरासाठी नांदेड व भोकर येथील 50 ते 60 तज्ञ डॉक्टरांची टीम येणार असल्याची माहिती मिळाली आहे, या आरोग्य शिबिरात 5 रक्त तपासण्याच्या भव्य प्रयोगशाळा असणार आहेत, सोबतच असाध्य रोगावर उपचार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामीण आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत 5 ते 6 लाखापर्यंत मोफत उपचार मिळवून देण्यात येईल तसेच किडनी हृदय रोग व कॅन्सर सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णांना मुंबई-पुणे, औरंगाबाद येथील खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार करण्यात येईल,
   शिबिरासाठी मा. श्री संजय मेहरे (धर्मादाय आयुक्त मुंबई), श्री विजयकुमार मगर (पोलीस अधीक्षक नांदेड), माननीय श्री धोळकिया (प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड), श्री डॉ अविनाश भोसीकर (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ बालाजी शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड), डॉ वाय एच चव्हाण (अधीक्षक शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड),  श्री पवन चांडक (उपविभागीय अधिकारी भोकर),  श्री भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर),  श्री जी एल रामोड (गटविकास अधिकारी भोकर ), श्री डॉक्टर अशोक मुंडे (अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर) हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती न्यायाधीश श्री मुजीब शेख अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग एक आणि श्री एडवोकेट एस एस कुंटे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे तरी भोकर व भोकर तालुक्यातील सर्व वयोगटातील महिला व पुरुष रुग्णांनी ह्या शिबिराचा फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.