भोकर : (रमेश गंगासागरे ) शहरी व ग्रामीण भागात विज चोरीला आळा घालण्यासाठी विज वितरण कंपनीने तालुक्यात मोठी मोहीम राबविली असून या मोहिमेत अनेक विजचोर मिळून येत आहेत, त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विजेचे दर दिवसागणिक भरमसाठ वाढत असल्याने सामान्य ग्राहकांना वीज भरणे परवडत नसल्याने अनेक जण ग्रामीण भागांमध्ये रात्रीस तारावर आकडे टाकून वीज चोरी करताना दिसून येत आहेत, त्यामुळे भोकर वीज वितरण कंपनीने अशा वीज चोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामूहिक मोहीम हाती घेतली आहे, आज पर्यंत अनेक चोरांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे ज्युनियर इंजिनिअर श्री साखरे यांनी दिली आहे, आज दिनांक 4 डिसेंबर 2019 रोजी सकाळी भोकर तालुक्यातील बटाळा या गावांमध्ये अचानक टाकलेल्या धाडीमध्ये 11 वीज चोर सापडले, तर भोकर येथील विविध भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून अचानक टाकलेल्या धाडी मध्ये 50 वीज चोर सापडले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ज्युनियर इंजिनिअर श्री साखरे यांनी दिली आहे, वीज वितरण कंपनीने अचानक राबविलेल्या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील व शहरातील असंख्य वीज चोरांचे धाबे दणाणले असून त्यांना विजेचा मोठा धक्का बसला आहे. विज वितरण कंपनीने राबविलेल्या या मोहिमेचे सर्वस्थरातून अभिनंदन केले जात आहे. आजच्या मोहिमेत इंजिनिअर श्री, साखरे यांच्यासह श्री, पांचाळ, श्रीरामवार, सूर्यवंशी, चव्हाण, कोरेबोइनवाड, कदम यांच्यासह अनेक जणांनी उपस्थिती होती.

0 Comments