भोकर :(रमेश गंगासागरे )भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात य.च.म.मु.विद्यापीठ नाशिक अंतर्गत 17 डिंसेबर ते 3 जानेवारी या कालावधीत घेण्यात येणाऱ्या या परीक्षा केंद्रावर २९५ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. भोकर येथे पुरवणी परीक्षेचे केंद्र दिल्यामुळे भोकर ,उमरी,हि.नगर, धर्माबाद  तालुक्यातील विद्यार्थ्यांची गैर सोय दुर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत. कारण यापुर्वी ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना नांदेडला जावे लागत होते.
एम.ए. / एम.एस्सी.च्या सेमिस्टर व बी.ए, /बी.काँम. च्या पुरवणी परीक्षा परीक्षेला  सकाळ / दुपार सञात सुरळीत सुरुवात  चालू आहेत.
     या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. डाँ.माधवराव पाटील किन्हाळकर, सचिव मा. मुरादसाब मांजरमकर, प्राचार्य तथा केंद्र प्रमुख डाँ.पंजाब चव्हाण व नांदेड विभागीय केंद्राचे साह्ययक कुलसचिव तथा संचालक मा. चंद्रकांत पवार  हे मार्गदर्शन करीत आहेत.
        परीक्षा केंद्रावर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून बहिस्थ पर्यवेक्षक डाँ. मारोती देशमुख, अभ्यासकेंद्रचे केंद्र संयोजक प्रा. होगे राधाकिशन , केंद्र साह्यायक प्रल्हाद सुर्यवंशी ,तांत्रिक साह्ययक बादे लिंगारेड्डी 'सेवक विजय सुर्यवंशी,  नितीन वायकोळे दैनंदिन प्रशासकीय  कामकाज पाहत आहेत. परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून डाँ अभिजित कांडलीकर ,डाँ.फोले कमल, प्रा. रायभोळे प्रदीप, प्रा. कदम गजानन ,प्रा, साजीद एम.डी., प्रा. पुपलवाड पांडुरंग , प्रा. कदम आनंद ,प्रा. खोकले किशन  प्रा, वाघमारे सुधिर , सह ईतर काम करीत आहेत .