भोकर :(संदिप गंगासागरे ) आज सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी मुंबई येथे भोकर चे आमदार श्री अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेताच भोकर मधील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी भोकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
        यात  हामीदखान खान पठाण, ताहेर बेग, बाबुभाई तामसेकर, खमर भाई, बालाजी पांचाळ, परमेश्वर ढवळे, बाबुराव पाटील, संदीप गंगासागरे, सुरेश कावळे, पठाण कोळगावकर, यांच्यासह शेकडो अशोक चव्हाण समर्थकांचा समावेश होता, यावेळी काँग्रेस पक्षाचा विजय असो, सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, अशोक चव्हाण जिंदाबाद, महाविकास आघाडी जिंदाबाद चे नारे देण्यात आले.